About Prasthan

मा . पोलीस अधीक्षक सा . यवतमाळ कुमार चिंता यांचे संकल्पनेतून ऑपयरेशन प्रस्थान यवतमाळ जिल्ह्यामधे सुरु करण्यात आले आहे. या संकल्पनेचा उद्देश हा यवतमाळ जिल्ह्यातील गावापासून ते जिल्हा पातळीवर गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांची पावले रोखण्याकरिता तसेच भरकटलेले व वाममार्गाला लागलेले शाळा कॉलेज सोडलेले होतकरू तरुण व तरुणींना प्रथमच ऑपरेशन प्रस्थान या माध्यमातून निशुल्क विविध व्यावसायीक प्रशिक्षण देवून प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

       यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पोस्टे कडून इच्छुक तरुणांची यादी बनवून तरुणांना प्रेरणा हॉल यवतमाळ येथे दि . १७/१०/२०२४ रोजी मा. पो अधिक्षक सा. यवतमाळ व मा. अपर पोलीस अधीक्षक सा . यांनी सविस्तर मार्गदशर्न केले व दि . २१/१०/२०२४ रोजी २९ बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणाकरिता प्रथम कैशल्य प्रशिक्षण केंद्र राळेगाव येथे पाठविण्यात आले. यामध्ये हाऊस कीपिंग, फूड अँडग्रेव्हरेज सर्विस, २/४ व्हिलर दुरुस्ती शोरूम होस्ट असे ऐकून ४५ दिवसाच्या प्रशिक्षणाला पाठविण्यात आले आहे. प्रशिक्षण झाल्यावर या बेरोजगार तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध करून नागपूर, संभाजी नगर, येथे पाठविण्यात आले आहे. ऑपरेशन प्रस्थान ही संकल्पना गाव ते जिल्हा पातळीवर राबविण्याकरिता विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक सा. यवतमाळ यांचे संकल्पनेने बेरोजगारांना नवीन रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध करून देण्याची चळवळ दिवसेंदिवस वाढत आहे.

Photos

View more

Social Media

Follow us

Contact Us

Add.Office of the superintendent of police, L.I.C square,Yavatmal-445001

sp[dot]yavatmal[at]mahapolice[dot]gov[dot]in

07232-256701